माओवाद्यांचं मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी धोक्याची घंटा-मेटे| Sarkarnama |

4 years ago
3

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा आज मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौरा होता या दरम्यान त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली यावेळी माओवाद्यानी मराठा मोर्चाला दिलेलं पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचं मेटे यांनी यावेळी सांगितले, तसेच मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी सध्या दौऱ्यावर असून 26 जून औरंगाबाद येथे मेळावा घेणार असल्याचे मेटे यांनी जाहीर केलं.
सोलापूरला देखील जुलै च्या पहिल्या आठवड्यात मेळावा घेण्यात येईल तर 36 जिल्हात मेळावे घेणार असून विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. 27 जूनला मुंबईला 10 हजार बाईक ची रॅली काढण्यात येणार असून 5 जुलै पर्यंत सर्व प्रश्न सुटले नाहीत तर 7 जुलै रोजी होणारे अधिवेशन चालू देणार नाही असही मेटे यांनी सांगितले
तसेच खालील मुद्दे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत मांडले

विनायक मेटे
(अध्यक्ष,शिवसंग्राम)
#sarkarnama #maharashtra #maratha #reservation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...