शिवकालीन विहीर । चावीची विहीर । Keyhole shaped step well #Chavichivihir #badlapur

16 days ago
5

​ ⁨@TrekkersZindagi⁩ Support My Hindi Trek & Travel Channel.
DJI Air 2s Drone घेण्यासाठी आपल्या दादाला मदत करू शकता UPI ID : bandarkarsagar@oksbi

https://maps.app.goo.gl/md1UZrKh3z2Qcyyb7?g_st=ac

#SagarDadaVlogs #Sagardada #SagarDada

My social media
https://whatsapp.com/channel/0029VaRFcI3KAwEtuvtnVH3N
https://www.facebook.com/trekkersjindagi
https://www.instagram.com/trekkersjindagi/
Join us on Telegram
Click on given link if not working then search Trekkers Jindagi
https://telegram.dog/Trekkersjindagi
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतिहास -
शिवमंदिर पाहताना आपण एक हजार वर्षे मागे जातो. त्यानंतर थेट बदलापूरचा उल्लेख हा शिवकाळात आढळतो. शिवरायांनी रायरी पासून कल्याण भिवंडी हा मुलुख इ.स. १६५७ साली घेतला. त्या नंतरच्या काळात इ.स. १७३९ सालच्या वसईच्या स्वारीत बदलापूर चा उल्लेख आढळतो. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर उभारताना, शिलाहारांचे राज्य घडताना, शिवछत्रपतींच्या घोड्यांच्या टापांनी कल्याण विजयाने आसमंत दुमदुमून टाकणारे आवाज ऐकताना, सुरत लुटीच्या स्वारीत महाराजांच्या सहवासाने पावन झालेल्या त्याचबरोबर मराठे-इंग्रज यांच्यात श्री मलंगगडाचे इ.स. १७८० सालचे घनघोर युद्ध घडताना बदलापूर - अंबरनाथ परिसर व इतर आसपासच्या परिसरातील किल्ले, मंदिरे व इतर वास्तु हे सर्व इथे घडलेल्या घटनांचे मूक साक्षीदार आहेत. ही पार्श्वभूमी सांगण्याच कारण म्हणजे आज आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या या शहरांना किती अनन्यसाधारण महत्व होते याचा प्रत्यय यावा सासाठीच हा खटाटोप आहे. अशाच एका ऐतिहासीक महत्व असलेल्या वास्तूचा अर्थात शिवकालीन विहिरीचा म्हणजेच, चावीच्या आकाराच्या विहिरीचा थोडक्यात इतिहास जाणून घेणार आहोत.
सतराव्या शतकात बांधलेली ही शिवकालीन विहीर आपले वैभव जपत इतिहासाच्या पाऊलखुणांचे दर्शन घडवते. या शिवकालीन विहिरीचे वैशिष्टय म्हणजे या विहिरीला असलेला आकार. ही विहिर लांबून पाहिले असता एक भलेमोठे शिवलिंग पाहिल्यासारखे वाटते तर आकाशातून पाहिले असता एखाद्या कुलुपाला चावी लावायची जशी खाच असते अगदी त्याप्रमाणे भासते. समोरून एखादी भली मोठी चावी असल्याचे दिसते. ही शिवकालीन विहीर पूर्णपणे दगडी चिऱ्यात पद्धतशीर एकमेकांची सांगड घालून बांधली आहे. या शिवकालीन विहिरीचा दक्षिणेकडील भाग हा निमुळता तर उत्तरेकडील भाग गोलाकार आहे. या शिवकालीन विहिरीची एकूण लांबी ही जवळजवळ ४० फूट इतकी आहे आणि निमुळत्या सरळ भागाची लांबी ही २६ फूट तर रुंदी ८ फूट इतकी आहे व खोली ३५ फूट इतकी आहे. या शिवकालीन विहिरीमध्ये उतरायला २५ पायऱ्या आहेत. ६ पायऱ्या उतरून या शिवकालीन विहिरीच्या मधोमध आल्यावर पूर्व-पश्चिम अशा दोन्ही बाजूस सुबक कमानीचे दोन कोनाडे आहेत. त्यावर तीन पाने असलेले नक्षीकाम केले आहे. या कोनाड्यांचा उपयोग हा पूर्वी रात्रीच्या वेळी दिवे लावण्यासाठी केला जात असे. आणखी काही पायऱ्या उतरल्यावर समोरच एक नक्षीदार कलाकुसर केलेलं अर्धकमान पूर्व-पश्चिमेस अजून एक कोरीव काम आहे आणि त्यावर देखील दोन छोटी फुले कोरलेली आहेत. कमानीच्या वरच्या भागात या शिवकालीन विहिरीचा मुख्य आकर्षण असलेले तीन शिल्पे कोरलेली आहेत. हे तीनही शिल्पे अतिशय सुंदर आहेत. न्यांच्यावरील कोरीव काम हे वाखाणण्याजोगे आहे. मध्यभागी श्री गणेशांची बसलेल्या मुद्रेत सुबक मुर्ती कोरलेली आहे. श्री गणेशांच्या बाजूच्या न्ही मुर्त्या नक्की कोणाच्या आहेत हे कळत नाही. या तीनही शिल्पांच्या समोर पूर्व-पश्चिम अशा दिशेला शरभ शिल्प कोरलेले आहे. परंतु र्देवाने या दोन्ही शरभ शिल्पांचे मुख तुटलेल्या अवस्थेत आहेत. या शिवकालीन विहिरीला बारमाही पाणी असते.
आजवर मिळालेल्या माहितीनुसार पेशवेकाळात थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या इ.स. १७३९ च्या वसई मोहिमेत कल्याण प्रांताच्या परिसरात पेशवे सैनिकांचे तळ पडले होते. या ठिकाणी सैनिकांना व घोड्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने शिवरायांच्या काळात बांधल्या लेिल्या या विहिरीचे बांधकाम हे शिवकालीन शैलीतील वाटते. परंतु ही विहीर नक्की कोणी बांधली याचा उल्लेख कोणत्याही शिलालेखात आढळत नाही.
सौजन्य- श्री शिवराजस्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व समस्त ग्रामस्थ मंडळ देवळोली)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Music in this video

Loading comments...